description:
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती.
ग्रामपंचायत अंबप येथे आज शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ. दिप्ती विकासराव माने, उपसरपंच श्री. आशिफ अबुबकर मुल्ला, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य श्री. अविनाश अंबपकर,श्री. कृष्णात गायकवाड, सौ. सारिका हिरवे,सौ. सरिता कांबळे, सौ. ज्योती माने तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
सावित्रीची लेक आज देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू ते गावाच्या प्रथम नागरिक महिला लोकनियुक्त सरपंच यांच्यापर्यंत सर्वच ठिकाणी महिलांनी आपला ठसा उमटविला आहे तो त्यांच्यामुळेच. ज्यांनी महिलांना ताठ मानेने जगायला शिकवलं, त्यांच्या हातात पाठी पेन्सिल दिली,ब्रिटिश राजवटीत समाजाचा विरोध सहन करून सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली व देशातील पहिल्या महिला शिक्षिका झाल्या,अशा थोर समाज सुधारक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय अंबप येथे लोकनियुक्त सरपंच सौ. दीप्ती विकासराव माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपसरपंच अशीफ मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य अविनाश अंबपकर, कृष्णात गायकवाड, सरिता कांबळे,सारिका हिरवे,ज्योती माने आणि शाळेच्या विद्यार्थि उपस्थित होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला उपस्थित विद्यार्थिनींना ग्रामपंचायत च्या कार्यालयीन कामकाज विषयी माहिती देण्यात आली आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील विद्यार्थिनीला सरपंच होण्याचा मान देऊन तसेच इतर सावित्रीच्या वेशातील विद्यार्थि
Create or Login to Your Gram Panchayat Account
(ग्रामपंचायत खाते तयार करा किंवा लॉगिन करा)