आरोग्य शिबिरे आणि लसीकरण मोहिमा
ग्रामपंचायत अंबप (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत अवयव दान व नेत्रदान नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अवयवदान व नेत्रदानाच्या संकल्पनेतून गरजू रुग्णांना जीवनदान व अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, हा जनजागृतीचा उद्देश आहे. हा कार्यक्रम २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत कार्यालय, अंबप येथे होणार असून, नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.